पराभवामुळे टॉप-4 ची संधीही हुकली
| मुंबई | प्रतिनिधी |
प्रो कबड्डी लीग 2025 स्पर्धेत गुरुवारी दुसरा सामना युपी योद्धाज आणि यू मुंबा या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात युपी योद्धाजचा संघ यू मुंबावर भारी पडला आहे. यू मुंबाने हा सामना 35-32 च्या गुणांसह 3 गुणांनी आपल्या नावावर केला. हा या हंगामातील युपी योद्धाजचा यू मुंबावर सलग दुसरा विजय आहे. या पराभवासह यू मुंबाची टॉप 4 मध्ये जाण्याची संधी हुकली आहे. या सामन्यात यू मुंबाने पकड करत संघाचं खातं उघडलं. त्यानंतर अजित चौहानने चढाईत 1 गुण घेत संघाच्या खात्यात भर घातली. पूर्वार्धातील 20 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर दोन्ही संघ 17-17 गुणांनी बरोबरीत होते. उत्तरार्धातील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. उत्तरार्धातील सुरुवातीच्या 5 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर युपी योद्धाजचा संघ 21-19 गुणांसह 2 गुणांनी आघाडीवर होता.सामन्यातही शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना युपी योद्धाजचा संघ 31- 25 गुणांसह 6 गुणांनी आघाडीवर होता. शेवटी युपी योद्धाजने यू मुंबावर 35-32 गुणांसह 3 गुणांनी विजय मिळवला.
