| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशाचे लष्करप्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी मावळते लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. लष्करप्रमुखपदाचा कार्यभार हाती घेण्यापूर्वी जनरल द्विवेदी हे लष्कराच्या उपप्रमुख पदावर कार्यरत होते. 2022 पासून त्यांच्याकडे लष्कराच्या उत्तर विभागाची (नॉदर्न कमांड) जबाबदारी होती. जनरल द्विवेदी हे देशाचे 30 वे लष्कर प्रमुख ठरले आहेत. 1984 मध्ये जम्मू-काश्मीर रायफल्समध्ये सर्वप्रथम द्विवेदी यांची नियुक्ती झाली होती. नॉदर्न कमांडमध्ये कमांडर म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. लष्करात सध्या आमूलाग्र बदल सुरू असून, त्याच्या आधुनिकीकरणाचेही काम सुरू आहे. अशावेळी जनरल द्विवेदी यांनी लष्करप्रमुख पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. चाळीस वर्षांच्या कार्यकाळात द्विवेदी यांनी जम्मू-काश्मीर रायफल्स बटालियन, 26 सेक्टर आसाम रायफल्स ब्रिगेड, नाईन कोअर अशा विभागात काम केले आहे
लष्करप्रमुखपदी उपेंद्र द्विवेदी
