गदारोळातच अधिवेशनाचे सूप वाजले

सत्ताधारी, विरोधक आक्रमक

| मुंबई | प्रतिनिधी |

सत्ताधारी, विरोधकांच्या आरोप, प्रत्यारोपातच विधिमंडळ अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ताधार्‍याना लक्ष करताना मुंबई महापालिकेतील गैरकारभाराची चौकशी करण्याची घोषणा केली.

विधानसभेत भाजप आमदार अमित साता यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित काही कंपन्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या कंपन्यांवरील भाष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

विरोधकांचा हल्लाबोल
राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर विधानसभेत गदारोळ झाला. प्रश्‍नांची उत्तरे द्यायला मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे विरोधक चांगलेच संतापले. यावेळी विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेतून सरकारवर हल्लाबोल केला.

अजित पवार म्हणाले, हे अधिवेशन माझ्या राजकीय कारकिर्दीतील पहिले अधिवेशन असेल. सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांची उपस्थिती नगन्य होती. आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र मंत्री उपस्थित नसल्यामुळे लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ अध्यक्षांवर अनेकवेळा आली. आम्ही सत्तेत असताना सभागृहात हजर राहायचो. आता देखील आम्ही रात्री 11 पर्यंत हजर राहायचो. दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 292 अंतिम आठवडा प्रस्ताव आणि 194-3-4 चं उत्तर देत आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात असं कधीही झालं नाही. हे अतिशय बेजबाबदारपणाचे काम होत. मी कुणावर आरोप करत नाही पण हा सरकारचा बेजबाबदारपणा असल्याचे अजित पवार म्हणाले.

Exit mobile version