हिंदुस्तान पेट्रोलियम कॉ.लि.कडून स्वच्छता मोहीम
| उरण | प्रतिनिधी |
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ स्थानक प्रबंधक शैलेंद्र राव यांच्या नेतृत्वाखाली कंपनीतील कामगारांनी स्वच्छता अभियान-2025 निमित्ताने उरण पिरवाडी चौपाटीवर शनिवारी (दि. 12) स्वच्छता अभियान हाती घेतले. पिरवाडी चौपाटीवर विखरलेला केरकचरा गोळा करुन त्यांची योग्य जागेवर विल्हेवाट लावली. यावेळी उरणवासियांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आपला परिसर स्वच्छ ठेवा, झाडे लावा, पर्यावरण वाचविण्याचे आवाहन प्रकल्पातून काढलेल्या रॅलीतून कंपनीचे मॅनेजर प्रबंधक हेमंत कुमार यांनी केले आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी, भेंडखळ ग्रामपंचायत व सागरी पोलीस कोस्ट गार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने उरण पिरवाडी चौपाटी येथे शनिवारी (दि.12) राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियान कार्यक्रमात कंपनीचे वरिष्ठ स्थानक प्रबंधक शैलेंद्र राव, कंपनीचे मँनेजर प्रबंधक हेमंत कुमार, प्रबंधक अमेया श्री, सागरी कोस्ट गार्ड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी ठाकूर, पोलीस कर्मचारी संदिप पाटोळे, पोलीस कर्मचारी जितेंद्र सावळाकर,नागाव ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी किरण केणी, सह एचपीसीएल कंपनीचे कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्वच्छ भारत अभियान हे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे अभियान आहे, ज्याचा उद्देश रस्ते आणि पायाभूत सुविधा स्वच्छ ठेवणे आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे असल्याचे कंपनीचे अधिकारी हेमंत कुमार यांनी पटवून दिले. या स्वच्छता अभियान निमित्ताने कामगारांनी गोळा केलेला कचरा नागाव ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत भरून त्याची योग्य ठिकाणांवर विल्हेवाट लावण्याचे काम केले.







