उरणची बाजारपेठ सजली

गणेशभक्तांची खरेदीसाठी गर्दी

| उरण | वार्ताहर |

बाप्पाच्या आगमानासाठी उरण बाजारपेठ सजली असून, पूजा साहित्य, सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे. त्यामध्ये सुगंधीत अगरबत्ती, अनेक प्रकारचं धूप, कापूर, अनेक प्रकारच्या कंठ्या, तुपवाती, कापूस वाती, अलंकार कंटी, अनेक फुलांचे हार, गणपती बाप्पा मोरयाची पट्टी, अत्तर, रुमाल, मोती कंटी, अशा अनेक वस्तूंनी बाजारपेठ बहरली आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र, यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने भक्तांकडून विविध साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. यावर्षी सुगंधी अगरबत्तीची मोठी मागणी असल्याची माहिती मानकी अगरबत्ती विके्रत्या मीना पटले यांनी दिली.

Exit mobile version