गोशीन रियू स्पर्धेत उरणकर चमकले

। उरण | वार्ताहर ।
10 ते 12 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पुणे येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत उरण तालुक्यातील गोशीन रियू कराटेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. उरण तालुक्यातील सुयश प्राप्त केल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. या यशस्वी स्पर्धकामध्ये रोहित शरद घरत सिल्व्हर मेडल, शुभम परशुराम म्हात्रे ब्रॉन्झ मेडल, नेहा विशाल पाटील यांनी ब्रॉन्झ मेडल मिळविले. परेश पावसकर, समीक्षा पाटील, अभिज्ञा पाटील, श्‍लोक ठाकूर, वेदा ठाकरे आदी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना सिहान राजु कोळी, गोपाळ म्हात्रे, मटीवानंद, राहुल तावडे, अतुल पोतदार, अतुल बोरा यांनी मार्गदर्शन केले. ही स्पर्धा सल्लाऊदिन अन्सारी, संदीप गाडे,संदीप वाघचौरे, अनुप देटे, कैलास लबडे पाटील, हरिदास गोविंद यांनी आयोजित केले होते.

Exit mobile version