जलतरण स्पर्धेत उरणच्या आर्यन मोडखरकरचे वर्चस्व

। उरण । वार्ताहर ।
पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून तसेच नवी मुंबईमधील स्पर्धकांनी सहभाग घेत, आपलं कौशल्य सादर केलं आहे. या स्पर्धांमध्ये उरणच्या स्पर्धकांनी आपली छाप सोडली. तर उरणकरांकडून आर्यन मोडखरकरचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

तिसर्‍या इंव्हीटेशनल डिस्ट्रिक्ट लेव्हल जलतरण स्पर्धांचे आयोजन कर्नाळा स्पोर्ट्स असोसिएशन आणि ऍक्वा स्पोर्ट्स असोसिएशन, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. रविवारी कर्नाळा स्पोर्ट्स येथे झालेल्या या स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्यासह नवी मुंबई येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. आठ वर्षे ते चाळीस वर्षांवरील गटांमध्ये या स्पर्धा खेळविण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये उरणच्या स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपली छाप उमटवली आहे. स्पर्धेत आर्यन मोडखरकर याने फ्रीस्टाई 50 मी, बॅक्स्ट्रोक 50 मी आणि बटरफ्लाय 50 मी. या तीन स्पर्धा करीत तीनही स्पर्धांमध्ये गोल्ड मेडलची कमाई केल्याने त्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून जयदीप सिंग- ब्रँझ, निर्भय पाटील- एक सिल्व्हर एक बाँझ, आर्य पाटील- एक सिल्व्हर एक बाँझ, रुद्राक्षी टेमकर- दोन सिल्व्हर, ओंमकार कोळी- एक सिल्व्हर दोन ब्रँझ, मोहित म्हात्रे- एक गोल्ड, एक सिल्व्हर आणि दोन ब्रँझ, वेदांत पाटील- एक ब्रँझ, वृतिका म्हात्रे- दोन सिल्व्हर, अनिता म्हात्रे- एक गोल्ड एक सिल्व्हर आणि हितेश भोईर- एक गोल्ड मेडल्सची कमाई केली आहे. सर्व स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version