उरणची भूसंपादन समस्या सोडविणार- आ.बाळाराम पाटील

। उरण । वार्ताहर ।
उरणची भूसंपादन समस्या सोडविण्यासाठी शेकाप कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. बाळाराम पाटील यांनी दिली. उरण तालुक्यातील नागाव, केगाव, चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व जमिनी सिडकोने ताब्यात घेण्यासाठीचे नोटिफिकेशन वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्यानंतर तिन्ही ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्‍यांनी निषेध करुन आपल्या जमीनी न देण्याचा निर्धार केला.

शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विधान परिषदेत लक्षवेधी मांडून आवाज उठविण्यासाठी आ. बाळाराम पाटील यांना निवेदन देत ही समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी तिन्ही ग्रामपंचायतीचे प्रमुख कार्यकर्ते गजानन म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, मधुसूदन म्हात्रे, कॉ.म्हात्रे, लक्ष्मीकांत पाटील, सुनील पाटील, अ‍ॅड.प्रदीप पाटील, शरद कडू, काका पाटील, माया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version