लक्ष्मीपूजनासाठी मूर्ती घडविण्याची लगबग

| खांदेश्वर | प्रतिनिधी |

येत्या 5 नोव्हेंबरपासून दीवाळी सणाला सुरुवात होत असून, 8 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाचा मुख्य दिवस साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पनवेलमधील कुंभारवाड्यात लक्ष्मीच्या मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे.

लक्ष्मीपूजनासाठी आकर्षक आणि सुबक मूर्ती घडविण्याचे काम कुंभार कलाकारांनी हाती घेतले आहे. पारंपरिक पद्धतीने मातीच्या मूर्ती तयार करण्यापासून ते त्यांना रंगरंगोटी करून आकर्षक रूप देण्यापर्यंतची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. लक्ष्मीमातेच्या विविध आकारांतील मूर्तींना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. काही मूर्तींना आकर्षक वस्त्रालंकार, मुकुट आणि दागिन्यांनी सजविण्यात येत आहे. तर, काही मूर्तींमध्ये पारंपरिक कलाकुसरीला प्राधान्य दिले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्ष्मीपूजनासाठी मूर्ती खरेदी करण्याकरिता नागरिकांची पावले कुंभारवाड्याकडे वळणार आहेत. त्यामुळे कुंभार कलाकारांनी वेळेत मूर्तींचे काम पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत सुरू केली आहे.

Exit mobile version