एसटी मार्ग फलकांसाठी खडूचा वापर

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण; आगार प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

| चिपळूण | प्रतिनिधी |

प्रवासी वाहतुकीचे केंद्र असलेल्या चिपळूण आगारात मार्ग फलकासाठी बसेसच्या काचेवर खडूने मार्ग लिहून त्या रवाना केल्या जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे लिहिलेले मार्ग वेळीच न पुसता तिच बस अन्य मार्गावर नेली जाते. अगोदरचे खडूने लिहिलेल्या मार्गाचे नाव तसेच ठेऊन नियोजित दुसऱ्या मार्गासाठी राहत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी आगार प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी आगारात चालकांना मार्गफलकासाठी स्वतंत्र सूचना दिल्या जात होत्या. शिवाय नियम न पाळल्यास कारवाई होत असे. मात्र सध्यस्थितीत आगार प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. नियोजित मार्गावर एसटी बस रवाना होत असताना त्या फलाटावर येण्यापूर्वी त्यांना मार्गफलक असणे बंधनकारक आहे. अनेकदा चालक बस फलाटावर आल्यानंतर मार्गफलक लावत असल्याचे चित्र आहे. तर काही चालक या नियमावलीची पूर्णतः पायमल्ली करत मार्गफलक न मिळाल्याने नवी शक्कल लढवत बसेसच्या काचेवर खडूने नियोजित मार्गाचे नाव लिहून फलक तयार करतात. विशेष म्हणजे त्या मार्गावरून ही एसटी बसस्थानकात आल्यानंतर तो खडूने लिहिलेला फलक पुसणे नसल्याने ही बस अन्य मार्गावर जातेवेळी चालक पुन्हा नियोजित दुसऱ्या मार्गाचे फलक लावत असल्याने यामुळे एकच बस दोन मार्गाने दर्शवली जाते. या प्रकारामुळे प्रवाशांची मोठी फसगत होत आहे. खरंतर खडूचे मार्ग लिहून बस रवाना केल्यास त्या चालकांवर कारवाई होत असे. मात्र, आगार प्रशासनाला याचा विसर पडला असल्याचे चित्र आहे.

Exit mobile version