हॉटेल व्यावसायिकांनी घेतला मुंढेचा धसका

उरणमध्ये पामतेलच्या जागी जेमिनीचा वापर

| उरण | प्रतिनिधी |

राज्यातील कर्तव्यदक्ष आणि कठोर प्रशासनासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यांनतर राज्यभरात अन्नसुरक्षा, भेसळ प्रतिबंध आणि अवैध व्यवसायांविरोधात कारवाईचा वेग वाढवला आहे. त्यांच्या या कठोर भूमिकेमुळे अनेक ठिकाणी व्यापारी आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्या कारवाईचा धसका आता उरण तालुक्यातील हॉटेल व्यवसायिकांनी घेतला असून हॉटेलमधील खाद्य पदार्थांच्या वापरामध्ये पामतेला ऐवजी सर्रासपणे जेमिनी तेलाचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उरण हा मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला तालुका असून या तालुक्यात जेएनपीए बंदर, एनएडी, ओएनजीसी, भारत गॅस तसेच इतर महत्वाचे शासकीय व खाजगी प्रकल्प आहेत. या तालुक्याच औद्योगिककरण व नागरिकरण झपाट्याने वाढत असल्याने हॉटेल, बार, खाणावळ यासारख्या इतर खाद्यपदार्थ व्यवसायिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या व्यवसायिकांवर कोणाचा अंकुश नसल्याने हे व्यवसायिक पामतेलामध्ये तयार करणारे पदार्थ उघड्यावर ठेवून नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र, राज्यातील कर्तव्यदक्ष आणि कठोर प्रशासनासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यांनतर राज्यभरात अन्नसुरक्षा, भेसळ प्रतिबंध आणि अवैध व्यवसायांविरोधात कारवाईचा वेग वाढवला आहे. त्यांच्या या कठोर भूमिकेमुळे अनेक ठिकाणी व्यापारी आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्या कारवाईचा धसका आता उरण तालुक्यातील हॉटेल व खाद्यपदार्थ व्यवसायिकांनी घेतला असून हॉटेलमधील खाद्य पदार्थांच्या वापरामध्ये आता पामतेला ऐवजी सर्रासपणे जेमिनी तेलाचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

एकंदरी नियमांचे पालन न करणारे, निकृष्ट अथवा भेसळयुक्त वस्तूंची विक्री करणारे आणि बेकायदेशीर व्यवहार करणारे व्यापारी विशेषतः सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version