हॅम रेडिओचा वापर आपत्ती काळात योग्यच – तहसीलदार मीनल दळवी

रायगडचा युवक फाउंडेशनतर्फे हॅम रेडिओ प्रात्यक्षिक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

हॅम रेडिओ वापराच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन जयपाल पाटील यांनी केले होते. जयपाल पाटील यांनी तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात नायब तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अजित टोळकर, हॅम रेडिओ परवानाधारक रायगडचा युवक फाऊंडेशनचे खजिनदार सत्यम पाटील, आपत्ती व सुरक्षा मित्र मंगेश राऊत, प्रथमेश भगत हे अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरून तहसीलदार मीनल दळवी व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील सोबत तहसील कार्यालय मध्ये संवाद साधत होते. हॅम रेडिओ कंट्रोल चेंढरेमधून आपत्ती व सुरक्षा मित्र तथा हॅम परवानाधारक दिलीप बापट देत होते. यावेळी तहसीलदार यांनी वायरमन यांना आदेश देताच सिव्हिल हॉस्पिटलसमोर रस्त्यात पडलेल्या विजेच्या तारा काढण्यात आल्या.

हॅम रेडिओ वापराबाबतच्या प्रात्यक्षिकानंतर बोल्ट असताना अलिबाग तहसीलदार मीनल दळवींनी आपत्ती काळात मोबाईल यंत्रणा बंद पडल्यास रेडिओचा वापर करून तातडीने आपत्ती व्यवस्थापन करता येऊ शकते. सोबत वित्तहानी, मनुष्यहानी, आग, अपघातही आपण हॅम रेडिओचा वापर केल्याने टाळू शकतो, असे सांगितले.

यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या कार्यक्रमास नायब तहसीलदार राजेश नागे विभागीय कार्यालय अलिबाग श्रीमती नम्रता भोयर अधिकारी अलिबाग रायगडचा युवक फाऊंडेशनचे आपत्ती व सुरक्षा मित्र अश्रफ घट्टे ,पूजा पेडणेकर सुरेश खडपे,पत्रकार कवठेकर,महेश शेरमकर कार्यालय कर्मचारी व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version