दवाखान्याच्या आवारात पेव्हर ब्लॉकचा उपयोग

| माथेरान । वार्ताहर ।

माथेरान नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या बैरामजी जिजीभाई या दवाखान्यातील आवारात दगड मातीच्या रस्त्यामुळे रुग्णांना चालणे खूपच कठीण बनले होते. त्यामुळे एखाद्या रुग्णाला हात रीक्षामधून आणताना त्रासदायक बनले होते. याच ठिकाणी नगरपरिषदेच्या सभागृहात नेहमी बैठका आयोजित केल्या जातात. त्यावेळी या परिसरात दगडींमुळे अनेकदा ठोकर लागून किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याकामी नगरपरिषदेच्या प्रशासक तथा कार्यतत्पर मुख्याधिकारी सुरेखा भणगे (शिंदे) यांनी मुख्य रस्त्यावर असणारे जुने ब्लॉकस काढून त्याचा योग्य वापर दवाखान्याच्या आवारात केला आहे. त्यामुळे चालणे अगदी सोयीस्कर होत असून उन्हाळ्यात इथे रुग्णांना धुळीच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे.

Exit mobile version