। पनवेल । प्रतिनिधी ।
वाढत्या धूळ प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार महापालिका कार्यक्षेत्रातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्रीच्या वापराबरोबरच जनजागृती अभियानांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात महानगरपालिकेने पालिका कार्यक्षेत्रात 4 फॉग कॅनन वाहने (सूक्ष्म धूळ नियंत्रण करणारी यंत्रे) कार्यरत केली आहेत. या वाहनांद्वारे चारही प्रभागामध्ये दररोज धूळ प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने सूक्ष्मरित्या पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. याबरोबरच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील हवेतील प्रदूषणाची गुणवत्ता निरीक्षण करणेसाठी मोबाईल एअर क्वालिटी मॉनिटरींग व्हॅन कार्यरत आहे. या गाडीच्यामार्फत पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन हवा प्रदूषण गुणवत्ता पातळी तपासली जात आहे.