उसर गेल कंपनी प्रकल्पग्रस्तांवर हल्ला; अकरा जणावर गुन्हा दाखल

। रेवदंडा । प्रतिनिधी ।
उसर गेल कंपनी प्रकल्पग्रस्त आंदोलकावर हल्ला केल्या प्रकरणी रेवदंडा पोलिस ठाणे येथे फिर्यादीनुसार अकरा जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणे येथील महिला फिर्यादीचे पती व गावातील ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त असून विविध मागणीसाठी गेल कंपनी गेट जवळ 14 फेब्रुवारीपासून आंदोलनासाठी बसले आहेत. प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना खानावमधील अकरा जणांचा विरोध आहे,महिला फिर्यादी व साक्षीदार हे सकाळी पायी चालत भेरसे येथे मोलमजुरीचे कामासाठी जात असताना, खानाव येथील सहा जणांनी गेल कंपनीत नोकरीच्या कामावरून असलेल्या वादातून मनात राग धरून रस्ताने जात असलेल्या महिला फिर्यादी व साक्षीदार यांचा रस्ता आडवून त्यांना पुढे जाण्याचा अटकाव केला तसेच शिवीगाळ व दमदाटी करून लाकडी बांबूच्या काठीने मारहाण केली. तसेच यामधील आरोपी एक यांनी साक्षीदार यांचे गळयातील सोन्याचे अर्धा तोळयाची चेन काढून घेतली.

सदर झालेला प्रकार फिर्यादी व साक्षीदार यांना सांगितला, यावेळी तेथे एकूण अकरा जण बेकायदेशीरपणे एकत्रीत येवून यामधील क्रमांक एक यांनी आणलेला मसाला फिर्यादी व गेटजवळ असलेले साक्षीदार यांच्या डोळयात उडवला व लोखंडी सळीने हातावर व पायार मारहाण करून दुखापती केल्या. तसेच यामधील आरोपींनी हातातील लाकडी काठीच्या बांबूने तसेच हाताबुक्काने फिर्यादी यांच पती व साक्षीदार मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे येथे अकरा जणाचे विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहा.फौजदार पडवळ हे पो.नि. अशोक थोरात यांचे मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Exit mobile version