उषा नामदेव शिंदे यांचे निधन

माणगाव | वार्ताहर |
माणगाव येथील निवृत्त परिचारिका उषा नामदेव शिंदे यांचे दि. 6 ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. त्यांनी तळा आणि माणगाव तालुक्यात परिचारिका म्हणून 32 वर्षे सेवा दिली. त्यांच्या मागे त्यांचे पती आरोग्य विभागातील निवृत्त कुष्ठरोग तंत्रज्ञ नामदेव शिंदे, मुलगा रोहन शिंदे, मुलगी स्नेहल शिंदे, दीर, जावा, पुतणे असा मोठा परिवार आहे.त्यांचे दशपिंड विधी 15 ऑगस्ट रोजी, तर उत्तरकार्य विधी 17 ऑगस्ट रोजी माणगाव येथील राहत्या घरी होणार आहेत. यावेळी कोणताही दुखवटा स्वीकारला जाणार नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Exit mobile version