उसरोलीत शिंदे गटाला भगदाड

शेकडो कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन मुरूड तालुक्यातील उसरोली येथील बेलीवाडीमधील दीडशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

बेलीवाडीमधील कार्यकर्ते शिंदे गटात कार्यरत होते. परंतु, शिंदे गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून कार्यकर्त्यांनी शेकापच्या लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दीडशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचाराचा धडाका सुरु आहे. शेतकरी कामगार पक्षच विकास करू शकतो, ही भावना मनाशी ठेवून अलिबागसह रोहा, मुरूड तालुक्यातील शिंदे गटातील कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षात सामील होत आहे. ऐन निवडणुकीत शेकामध्ये कार्यकर्ते येत असल्याने शिंदे गटाचे उमेदवार दळवी यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचा विजय निश्‍चितच असल्याचा विश्‍वास शेकापच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी शेकाप अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष विक्रांत वार्डे, शरद कुमरोठकर, गणेश ठोंबरे, उदय थळे, महेश पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नवनिर्वाचित कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version