हाँग काँग क्रिकेट सिक्सेस 2024
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
हाँग काँग क्रिकेट सिक्सेस 2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. 1 ते 3 नोव्हेंबर अशी तीन दिवसीय ही स्पर्धा रंगणार आहे. भारत व पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धींना ‘क’ गटात एकत्रित ठेवण्यात आले आहे. याशिवाय संयुक्त अरब अमिरातीही या गटात आहे. एकूण 12 संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आदी तगडे संघही मैदानावर उतरणार आहेत. या स्पर्धेसाठी आताच भारतीय संघ जाहीर केला गेला आहे. या संघाचे नेतृत्व रॉबिन उथप्पा करणार आहे.
तब्बल सात वर्षांनंतर हाँग काँग क्रिकेट सिक्सेस ही स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. 2005 मध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली होती. पाकिस्तानने एकूण 4 वेळा या स्पर्धेत विजेतेपद भूषवले आहे.
स्पर्धेचे नियम
एका संघात सहा खेळाडू. पाच ते सहा चेंडूंचे षटक असते. यष्टीरक्षक वगळता क्षेत्ररक्षण करणार्या संघाचा प्रत्येक खेळाडू एक षटक टाकतो. अंतिम सामन्यात आठ चेंडूंचे षटक. वाईड आणि नो-बॉलसाठी दोन धावा. षटक पूर्ण होण्यापूर्वी पाच गडी बाद झाल्यास, शेवटचा उरलेला फलंदाज पाचव्या फलंदाजासह धावपटू म्हणून खेळेल. प्रत्येक जिंकलेल्या सामन्यासाठी संघाला दोन गुण मिळतात.
भारताचा संघ
रॉबिन उथप्पा (कर्णधार), भरत चिप्ली, केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, स्टुअर्ट बिन्नी.