। पनवेल । प्रतिनिधी ।
नवीन पनवेल सेक्टर 17 मधील पायल सोसायटी परिसरात असलेल्या उत्सव हॉटेलला अचानक भीषण आग लागली. घटनेनंतर नागरिकांनी त्वरित अग्निशामक दलाशी संपर्क साधून मदतकार्य सुरू केले. हॉटेलमधील कर्मचारी तसेच पायल सोसायटीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवून मोठ्या अनर्थापासून बचाव करण्यात आला. अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक नागरिक व समाजसेवकांनी विशेष सहकार्य केले. त्यांनी तातडीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली.







