ऑपरेशन सिंदूरमध्येही होते सहभागी; भातसई ग्रामस्थांकडून जाहीर सत्कार
| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील आदर्श गाव भातसई या गावचे सुपुत्र व गावातील पहिले सैनिक नायक उत्तम नथुराम खरीवले हे 17 वर्षानंतर भारतीय सैनिक सेवेतून निवृत्त झाले आहेत. निवृत्त झाल्यानंतर गावातील युवक, ग्रामस्थ व महिला मंडळकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गावातील आई महादेवी मातेच्या मंदिरात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सैनिक उत्तम खरीवले यांची वयाच्या 18 व्या वर्षी लष्करात भरती झाली. विशेष म्हणजे ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. त्यांना लहानपणापासूनच फौजी होण्याची प्रचंड इच्छा होती. प्रचंड इच्छाशक्ती आणि त्यांनी केलेले कठोर परिश्रमामुळे त्यांनी यशाला गवसणी घातली. देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने सैनिक उत्तम खरीवले यांनी आपल्या छोट्याश्या गावाचं नाव देश पातळीवर नेऊन ठेवल. आज जवळजवळ त्यांनी 17 वर्षे देशसेवेत अर्पण केली. त्यांच्या या योगदानाबद्दल सर्व गाववासियांना सार्थ आभिमान आहे. गावातील सर्व तरुणांना त्यांनी एक आदर्श निर्माण करून दिला आहे. अगदी कठीण प्रसंगी, कोणत्याही सुख, सोयी आजूबाजूला उपलब्ध नसताना त्यांनी गावातून पहिलं भारतीय सेनेत भरती होण्याचा मान मिळविला. गावातील प्रत्येक तरुण, युवावर्ग आज त्यांना आपले आदर्श मानतात. समस्त ग्रामस्थांसाठी एक ऐतिहासिक काल, जो पुढच्या कित्येक पिढ्यानंपिढ्या कथन केला जाईल की, भातसई गावामध्ये देशासाठी लढणारे तरुण जन्माला आले. त्यांची थोरवी वर्षानुवर्षे ऐकवली जाईल. असे जीवित्कार्य आज नायक उत्तम नथुराम खरीवले यांच्या हातून घडून आले आहे, असं मत अनेक ग्रामस्थांनी नियोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील, माजी सरपंच लिलाधर थोरवे, खरीवले भावकीचे अध्यक्ष हरिश्चंद्र खरीवले सर, तंटामुक्त ग्रुप ग्रा.पं.अध्यक्ष मोरेश्वर खरीवले, मेढा कुणबी समाज अध्यक्ष निवास खरीवले, प्रेस क्लब अध्यक्ष सुहास खरीवले, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष गणेश खरीवले, ग्रा.पं. सदस्य निरज खरीवले, अनिल खरीवले, समीर खरीवले, सुरेश कोतवाल, भरत कोतवाल, उदय थोरले, सामाजिक तसेच राजकीय अनेक मान्यवर व खरीवले परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.







