महिलांमध्ये रेशमा केवटे अव्वल
| पुणे | प्रतिनिधी |
बजाज अलियान्झ पुणे अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत 21.1 किलोमीटर प्रकारात उत्तम पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने 21.1 किलोमीटरचे अंतर 1 तास 5 मिनिटे अन् 4 सेकंदात पूर्ण केले. सुशांत जेधेने दुसऱ्या क्रमांकावर शर्यत पूर्ण केली. सुशांत जेधे आणि उत्तम पाटीलमध्ये फक्त 17 सेकंदाचे अंतर राहिले. सुशांतने 1 तास 5 मिनिटे 21 सेंकद वेळ नोंदवली. महिलांमध्ये 21.1 किलोमीटरची मॅरेथॉन रेशमा केवटेने जिंकली. तिने 1 तास 13 मिनिटे अन् 18 सेकंद अशी वेळ नोंदवली. 10 किलोमीटर अर्ध मॅरेथॉनमध्ये महिला विभागात साक्षी जडियालने 36 मिनिटे 52 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर पुरूष विभागात असिफ खानने 30 मिनिटे 25 सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत धावणारे फक्त पुणेकरच उपस्थित नव्हते, तर आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे मावळे देखील सर्वांच लक्ष वेधून घेत होते. हडपसर येथील भुराराम चौधरी यांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होत पारंपरिक वेशभूषा करत संकृती जपण्याचा संदेश दिला.
