प्रेक्षणीय सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कुरुळ येथील आझाद मैदानात स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी युव्ही स्पोटर्स व सिव्हील हॉस्पिटल अलिबाग संघामध्ये प्रेक्षणीय सामना झाला. या स्पर्धेत युव्ही स्पोटर्स संघाने दमदार कामागिरी बजावत विजय आपल्याकडे खेचून घेतला. प्रेक्षणीय सामन्यातील युव्ही स्पोटर्स संघ विजेता ठरला.
शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यासह सतिश टकले आणि मंगेश पाटील, संतोष पाटील, महेंद्र पाटील, अशोक घाडगे, प्रभाकर धसाडे, अशोक पाटील, योगेश पाटील, योगेश घाडगे प्रवीण कार्लेकर राकेश पाटील, मयूर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेक्षणीय सामन्याचा उद्घाटन सोहळा पार पडला.
युव्ही स्पोटर्स संघाने नाणे फेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. युवराज पाटील यांनी सुरुवातीला गोलंदाजी केली. पहिल्या षटकात सिव्हील हॉस्पिटल अलिबाग संघातील दोन गडी बाद करून आठ धावा दिल्या. त्यानंतर दुसर्या षटकात नितीन यांनी एक बाद करीत 15 धावा दिल्या. त्यानंतर तिसर्या षटकात सुबोध यांनी तीन बाद करीत तीन धावा दिल्या. चौथ्या षटकामध्ये दिवेश यांनी दोन बाद करीत तीन धावा दिल्या. त्यामुळे सिव्हील हॉस्पीटल अलिबाग संघाचे आठ बाद 29 धावा झाल्या. यु.व्ही स्पोटर्स संघाला विजयासाठी 30 धावांची गरज होती. सुरुवातीला यु. व्ही स्पोटर्स संघाची फलंदाज बाद होऊ लागले होते. तिसर्या षटकापर्यंत या संघाच्या 17 धावा पाच बाद अशी अवस्था होती. विजयासाठी सहा चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती. अखेर या संघातील खेळाडूंनी जोरदार फटकेबाजी करीत 3.4 षटकामध्ये हा खेळ संपवून विजय आपल्याकडे खेचून घेतला. यु.व्ही स्पोटर्स संघातील सुबोध या खेळाडूला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
जेएम म्हात्रे यांची सदिच्छा भेट
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानात पीएनपी चषक 2025 टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसांच्या कालावधीत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, पनवेलचे माजी नगराध्यक्ष व उद्योजक जे. एम. म्हात्रे यांनी रविवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. वरसोली चॅलेंजर्स आणि शहापूर स्माशर्स या संघातील खेळाचा आनंदही घेतला. दरम्यान शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते जे. एम. म्हात्रे यांचे शाल व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच, पनवेलमधील नारायण शेट, मनोहर कानपिळे आदी मान्यवरांचे स्वागत यावेळी करण्यात आले.