पाली/बेणसे | प्रतिनिधी |
बेणसे व झोतिरपाडा ग्रामपंचायतीमधिल रहिवाश्यांसाठी उप प्राथमिक आरोग्य केंद्र बेणसे येथे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे / रिलायन्स फाउंडेशन तर्फे मोफत कोविड-19 लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लसीकरण मोहीमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. याकामी रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणेचे वरिष्ठ अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, अध्यक्ष शशांक गोयल, उपाध्यक्ष चेतन वाळंज एच आर, रमेश धनावडे, वरिष्ठ व्यवस्थापक डॉ.प्रशांत बारदोलाई डॉ. भानुप्रताप दुबे व वैद्यकीय टीम, सामाजिक कार्यकर्ते उद्धव कुथे, माजी सरपंच प्रिती कुथे, राजेश गोरे व उपप्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहायिका कर्मचारी व अन्य पदाधिकारी, ग्रामस्त उपस्थित होते.







