उमरोलीमध्ये लसीकरण शिबीर

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोव्हिड लसीकरण शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात 350 जणांनी लसीकरण करून घेत शिबिराला लाभ घेतला.
ग्रुप ग्रामपंचायत उमरोली मधील सदस्य भास्कर रघुनाथ लोंगले आणि प्रचिती सचिन गायकर यांच्या पुढाकाराने तसेच नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून उमरोली गावातील हनुमान मंदिरात लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमरोली ग्रामपंचायत आणि उमरोली शाखेच्या वतीने कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्व विशद केले आणि त्यामुळे तब्बल 350 जणांनी लसीकरण करून घेत शिबीर यशस्वी केले. यावेळी पहिला डोस 300 आणि दुसरा डोस 50 जणांना देण्यात आले.

शिबिर यशस्वी होण्यासाठी मनोहर ठाणगे, सचिन गायकर, तेजस तुपे विभाग अध्यक्ष मनसे, पंकज बुंधाटे शाखा अध्यक्ष उमरोली मनसे, जितेंद्र रुठे, दिलीप लोंगले, सुरज बुंधाटे, परेश लोंगले, अजय लोंगले, प्रवीण रुठे ओंकार घारे रोहिदास लोंगले, जयराम लोंगले, रामचंद्र घारे, जिग्नेश लोंगले, दिपक बुंधाटे, संकेत लोंगले, समीर तुपे, राजेश लोंगले, अजिंक्य लोंगले, गोपीनाथ घारे तसेच सुनंदा साळोखे, जयश्री ठाणगे, स्वाती शेंडे, हेमांगी मोहिल आदी उपस्थित होते.

Exit mobile version