कर्जत प्रभाग 3 मध्ये लसीकरण शिबीर

355 जणांनी घेतला लाभ
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषद प्रभाग क्रमांक-3 मध्ये दहीवली येथे लसीकरण शिबीर संपन्न झाले. यामध्ये 355 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने आणि कर्जत नगरपरिषदेच्या पुढाकाराने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नगरसेवक विवेक दांडेकर आणि स्थानिक नगरसेविका विशाखा जिनगरे यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. कोव्हीशिल्ड पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला.
दहीवली येथील श्रीराम मंदीराच्या सभागृहात लसीकरण शिबिराचे आयोजन करणात आले होते.नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, सुनिल गोगटे, प्रशांत उगले, सरस्वती चौधरी, सामिया चौगुले यांनी शिबिरास भेट दिली. उप जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शखाली डॉ. गुलाम नविवाला, पूनम जगदाळे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी श्रीराम मंदिराचे सेक्रेटरी विलास दांडेकर ,खजिनदार मनोहर दांडेकर, विजय जिनगरे सोनार आळी मधील शिवस्मृती मित्र मंडळाचे सदस्य व गुरव आळी मधील नवतरुण मित्र मंडळाचे सदस्यांनी त्यांना सहकार्य केले.कोव्हीशिड चा 287 व्यक्तींनी पहिला डोस व 68 व्यक्तींनी दुसरा डोस अश्या प्रकारे 355 नागरिकांचे लसीकरण झाले.

Exit mobile version