कर्जतमध्ये लसीकरण मोहीम यशस्वी

| नेरळ | प्रतिनिधी |

देशात पल्स पोलिओ लसीकरणाच्या माध्यमातून भारत देश पोलिओ मुक्त रहावा यासाठी शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात आले. कर्जत तालुक्यातील 22 हजार लाभार्थी बालकांना लस पाजण्यात आली असून 332 बूथवर आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

तालुक्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालय परिसरातील कर्जत नगर परिषद हद्दीमधील शहरी भागातील 4612 लाभार्थी बालकांचे पल्स पोलिओ डोस देऊन लसीकरण करण्यात आले. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाकडून 17 बूथ निर्माण करण्यात आले होते. तसेच, कोणतेही बालक लसीकरण शिवाय राहू नये यासाठी पुढील चार दिवस आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जावून लसीकरण मोहीम राबविणार आहेत. कर्जतसारख्या शहरी भागात आज नऊ ठिकाणी ट्राझिस्ट कॅम्प भरवून तेथे देखील लसीकरण मोहीम राबविण्यात आली. रविवारी (दि.3) सकाळपासून रेल्वे स्टेशन, बस स्थानक, उपजिल्हा रुग्णालय, आपला दवाखाना अशा ठिकाणी लसीकरण सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय मस्कर यांनी दिली. तालुक्याच्या ग्रामीण भागात आज सकाळपासून लसीकरण मोहिमेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी (दि.3) सकाळी आठ वाजता पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेला संतोष पेरणे यांच्या हस्ते लस पाजून मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम पावरा, डॉ. प्रताप गुंजाले, सुनील चव्हाण, काशिनाथ शेळके, लक्ष्मण देवके, सुप्रिया मस्तुद आदी उपस्थित होते.

Exit mobile version