अलिबाग शहरात आता फक्त डोंगरे हॉलमध्ये लसीकरण केंद्र

मराठी शाळेतील केंद्र बंद
मुख्याधिकार्‍यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग नगरपरिषदेचे मराठी शाळेतील लसीकरण केंद्र बंद करण्यात आले असून या पुढे अलिबाग नगरपरिषदेचे डोंगरे हॉल येथील लसीकरण केंद्रच फक्त सुरु राहणार असल्याची माहिती अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळूंखे यांनी दिली आहे. सदर लसीकरण केंद्रावर अलिबाग शहर तसेच अलिबाग तालुका येथील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
बुधवार, दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत अलिबाग नगरपरिषद सार्वजनिक वाचनालय (डोंगरे हॉल) येथील केंद्रावर कोव्हीशिल्डच्या पहिल्या डोससाठी 200 लाभार्थी, कोव्हीशिल्डच्या दुसर्‍या डोससाठी 200 लाभार्थी तर कोव्हीशिल्डच्या पहिल्या व दुसर्‍या डोससाठी ऑनलाईन पद्धतीने 100 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Exit mobile version