पालिका अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना दिली लस


। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
कोव्हिडच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यामध्ये आरोग्य विभागासह नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतरही विभागातील अधिकारी, कर्मचारीवृंदाने पहिल्या फळीतील कोरोना योद्धे म्हणून समर्पित भावनेने काम केले. या अधिकारी, कर्मचार्‍यांचे पहिल्या फळीतील कोरोना योद्ध म्हणून लसीकरण झाले होते. तथापि त्यांचे कुटुंबिय लसीकरणापासून वंचित होते आणि अधिकारी, कर्मचारी दररोज कामाला येऊन घरी परत जात होते. त्यामुळे त्यांच्या कुटुबियांनाही लस संरक्षण मिळावे अशी मागणी केली जात होती.

याबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सकारात्मक निर्णय घेतला व त्यांच्या मार्गदर्शनानुसार पहिल्या टप्प्यात मुख्यालयातील आरोग्य विभागासह इतर विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांच्या घरातील कुटुंबियांचे महापालिका मुख्यालयात आयोजित विशेष सत्रात लसीकरण करण्यात आले. 410 व्यक्तींनी या लसीकरणाचा लाभ घेतला. यानंतर लगेचच महानगरपालिकेची आरोग्य केंद्रे, विभाग कार्यालये तसेच इतर कार्यालये याठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्याही कुटुंबियांसाठी विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Exit mobile version