। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।
कोरोना प्रतिबंधित लसिकरणाचे डोसचा साठा संपल्याने गुरूवार दि. 15 जुलै रोजी अलिबाग नगरपरिषदेच्या तसेच शहरासाठीच्या सार्वजनिक वाचनालय येथील डोंगरे हॉलमधील लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील बहूतेक लसीकरण केंद्रातील डोसचा साठा संपला आहे. त्यामुळे गुरूवारी नागरिकांचे लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले. नव्याने प्राप्त झालेल्या डोस नंतर पुढील सुचना देऊन लसीकरण पुर्ववत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.