साठा संपल्याने अलिबागमधील लसीकरण पुन्हा बंद

Coronavirus Vaccine bottle Corona Virus COVID-19 Covid vaccines panoramic bottles

आरोग्य प्रशासनाची माहिती

। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।
कोरोना प्रतिबंधीत लसींचा साठा संपत असल्याने जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लसीकरण बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. लसीचा साठा संपल्यने अलिबाग नगरपरिषदेच्या तसेच शहरासाठीच्या सार्वजनिक वाचनालय येथील डोंगरे हॉलमधील लसीकरण केंद्रांवर पुन्हा एकदा बुधवार दि. 25 ऑगस्ट रोजी देखील लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील बहूतेक लसीकरण केंद्रातील डोसचा साठा संपला आहे. त्यामुळे नव्याने डोस प्राप्त न झाल्याने लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले. नव्याने प्राप्त झालेल्या डोस नंतर पुढील सुचना देऊन लसीकरण पुर्ववत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version