। खेड। प्रतिनिधी ।
तालुक्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच लसीकरण मोहिमेवर विशेष भर देण्यात येत आहे. तालुक्यात आत्तापर्यंत 1 लाख 67 हजार 733 नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील त्या – त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेस नागरिकांचाही उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. कोविशील्ड च्या पहिल्या डोस मध्ये 88780 जणांचे लसीकरण करण्यात आले. तर दुसर्या डोस मध्ये 44595 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोवँक्सिनच्या पहिला डोस मध्ये 16213 तर दुसर्या डोस मध्ये 14145 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 6444 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत 6200 लवकर रुग्णांनी कोरोनावर मात केली असून दोन रुग्ण सक्रीय आहेत. तालुक्यात कोरोन नियंत्रणात येत असल्याने आरोग्य यंत्रणेसह नागरिकांना दिलासा मिळत आहे.