380 विद्यार्थ्यांचे पालीत लसीकरण

सुधागड-पाली | वार्ताहर |
पालीत 15 ते 18 वर्ष वयोगटातील 380 मुलांनी शनिवारी (ता.22) कोव्हॅक्सीन लस घेतली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पाली यांच्यावतीने ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. डेर हायस्कूल ,ओसवाल ज्युनिअर कॉलेज येथे हे लसीकरण संपन्न झाले. लसीकरणास शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब घोडके व शिक्षक भिकन माळी यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. यावेळी शाळेतील इतरही शिक्षक उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र पालीच्यावतीने डॉ. दिपाली देशमुख, डॉ. श्रुती मोरे, औषध निर्माता मनिषा मूळे, आरोग्य सहाय्यक सुनील गायकवाड आरोग्य सहायिका स्वप्नजा देशमुख, विनया सोडिये, संगीता पाटील, आरोग्य सेवक लक्ष्मण करे, श्री. मार्कंडे, संतोष जाधव, श्री तांबडे तसेच आरोग्य सेविका उज्वला तांबडे व सुवर्णा म्हात्रे, कर्मचारी अजय गायकवाड व ज्ञानेश्‍वर जगताप उपस्थित होते. या संपूर्ण लसीकरणाचे नियोजन करण्यास वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version