| उरण | घन:श्याम कडू |
उरण मधील ओएनजीसी प्रकल्पाच्या माध्यमातून येथील नागाव आणि म्हातावली या गावातील सहाशे नागरिकांना मोफत कोव्हीड-19 लसीकरण करण्यात आले आहे. सदर लसीकरण डॉ. सुरेश पाटील यांच्या पालवी हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आले असून, ओएनजीसी प्रकल्पाच्या सीएसआर फंडाचा यासाठी वापर करण्यात आला आहे. येथील नागरिकांनी ऑनजीसी प्रकल्पाकडे सुविधा मिळण्याबाबत मागणी केली होती.
कोव्हीड-19 ही महामारी पूर्णतः नष्ट झाली नसल्याने, नागरिकांसाठी या महामारीतून वाचण्यासाठी सुरक्षा कवच ठरणारी लस घेणे गरजेचे झाले आहे. यासाठी ओएनजीसी प्रकल्प उरण यांनी एक पाऊल पुढे येऊन येथील नागाव आणि म्हातावली या दोन गावातील नागरिकांचे मोफत लसीकरण केले आहे. प्रकल्पबाधित या दोन गावांची नैतिक जवाबदारी प्रकल्पाने घ्यावी अशी मागणी होत असताना प्रकल्पाकडून नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे नक्कीच उल्लेखनीय आहे. येथील सहाशे नागरिकांना लसीकरणाचा पहिला दोन देण्यात आला आहे. यासाठी प्रकल्पाच्या सीएसआर फंडाचा वापर कटण्यात आला आहे. तर डॉ. सुरेश पाटील यांच्या पालवी हॉस्पिटलच्या माध्यमातून हे लसीकरण यशस्वी करण्यात आले आहे. यासाठी हॉस्पिटलच्या स्टाफने मेहनत घेऊन हे लसीकरण योग्यपद्धतीने पार पाडण्याची जवाबदारी घेतली होती. यासाठी लाभार्थींनी पालवी हॉस्पिटलचे आणि ओएनजीसी प्रकल्पाचे आभार मानले.