परदेशात जाणार्‍यांचे लसीकरण पूर्ण

| लांजा । वृत्तसंस्था ।
नोकरी निमित्ताने लांजा तालुक्यातील परदेशात असणारे नागरीक सुट्टी निमित्ताने गावी आले असून त्यांना लस मिळत नसल्याने त्यांना नोकरीसाठी पुन्हा परदेशात जाता येत नव्हते. त्यासाठी मुस्लिम वेल्फेअर संस्थेच्या पाठपुराव्याने आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे परदेशात जाणार्‍या नागरीकांचे लसीकरणाचे दोनही डोस पूर्ण झाल्याने त्यांचा रोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

लांजा तालुक्यातील अनेक नागरीक आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी निमित्ताने परदेशात काम करत असतात. परदेशात नोकरीस असणारे हे युवक सुट्टी निमित्ताने सध्या आपआपल्या घरी आले आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांची नोकरी संकटात आलेली आहे. अशा नागरीकांचा नोकरीचा प्रश्‍न असल्याने लांजात कँम्पचे नियोजन करुन त्यांचे पासपोर्ट किंवा व्हिसा तपासून अशा नागरीकांना लस देण्याचे नियोजन करण्याची मागणी मुस्लिम वेल्फेअरकडून संस्थेकडून तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी काही विलंब न करता तहसीलदार व आरोग्य प्रशासनाने बहुमुल्य सहकार्य करत परदेशात जाणार्‍या नागरिकांना दोनही डोस उपलब्ध करुन दिले.

लसीकरणाचा उपक्रम मार्गी लावण्यासाठी लांजाचे उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार समाधान गायकवाड, नायाब तहसीलदार उज्वला केळूसकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कोरे, रविंद्र वायदंडे व त्यांचे सहकारी आझाद विचारे या सर्वांच्या अथक प्रयत्नानी सदर कँम्प यशस्वी झाले. तसेच कोविशिल्ड लस मिळावी म्हणून मुस्लिम वेलफेयरचे अध्यक्ष रफिक नाईक, अकील नाईक,राजू नाईक यांनी या कँम्पचे नियोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version