नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांचे लसीकरण

। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्गाच्या कुटुंबियांचे कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लसीकरण करण्यात आले.

रायगड पोलिसांचं लक्ष कुठेयं?

राज्यात कोरोना या महामारीने थैमान घातले असून प्रशासन खबरदारी घेत होता. विनाकारण रस्त्यावर फिरू नये, यासाठी पोलिसांकडून संपूर्ण राज्यात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी नेरळ पोलिसांकडून सुद्धा नेरळ शहरात कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून शहराच्या ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला गेला.यावेळी पोलीस अधिकारीसह पोलीस कर्मचार्‍यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती.


रस्त्यावर उभे राहून कोरोना बाबत सुरक्षितता घेणारे पोलीस कर्मचारी यांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी यासाठी नेरळ पोलिसांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने नेरळ पोलीस ठाणे येथे पोलिसांच्या कुटुंबाचे लसीकरण केले.यावेळी 51 जणांनी कोव्हीशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतलाय,या मध्ये पोलीस कर्मचार्‍यांचे आई-वडील,पत्नी तर तरुण मुलांनी लसीकरण करून घेतले.

लसीकरणवेळी कर्जत तालुक्याचे उप विभागीय अधिकारी अनिल घेर्डीकर,नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय बांगर,तर पोलीस निरीक्षक भालचिम नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ सागर काटे,तसेच सुभाष चव्हाण सह अन्य नेरळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Exit mobile version