माथेरानच्या रुग्णवाहिकेला बनवली वडाप

। माथेरान । वार्ताहर ।
रुग्णांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध असावी याकामी पंधरा वर्षांपूर्वी लोकांच्या आग्रहास्तव माथेरान या नगरीत मोटार वाहनांना बंदी असताना सुध्दा केवळ रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सुरू करण्यात आली होती परंतु रुग्णांना सेवा देण्याऐवजी या गाडीचा एखाद्या वडाप प्रमाणे राजरोसपणे वापर सुरू केला आहे.
दिवसभर या गाडीच्या फेर्‍या सुरू असतात, याचा हिशोबसुद्धा दिला जात नाही. खासदार बारणे यांच्या खासदार निधीतून तीन वर्षापूर्वी दिलेली रुग्णवाहिका काही चालकांच्या मनमानीमुळे डबघाईला आलेली आहे. दस्तुरी ते माथेरान दरम्यान 300 रुपये आकारले जातात. दिवसभरात सध्यातरी वीस पेक्षाही अधिक फेर्‍या ही गाडी मारत असते. परंतु आजतागायत या गाडीची सेवा तोट्यात दाखवली जात आहे. या गाडीशी संबंधित मंडळी आर्थिक लाभ घेत आहेत आणि सर्रासपणे वापर सुध्दा करीत आहेत. मागील काळात वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. ज्यांना रुग्णवाहिका वेळेत मिळाली नाही ती मंडळी संबंधीत लोकप्रतिनिधींचे लागेबांधे असल्याने मूग गिळून गप्प बसले आहेत
सतत फेर्‍या मारुन या रुग्णवाहिका खिळखिळ्या झाल्या आहेत. इमर्जन्सीला रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे, ती उपलब्ध न झाल्यामुळे अनेक जणांना प्राण गमवावे लागलेत हे माहीत असून देखील सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळच सुरूच आहे.

ज्याप्रकारे मागील दोन दिवस अ‍ॅम्ब्युलन्सचा अनिर्बंध वापर केला आहे त्याचा मी निषेध करतो. हा अत्यंत लाजीरवाणा प्रकार असून दोषींवर कारवाई करावी. – मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष

Exit mobile version