| माणगाव | वार्ताहर |
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सरस्वती विद्या मंदिर वडघर(मुद्रे) तथा कै. शंकर सिताराम देशमुख विद्या संकुल या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन नुकताच संपन्न झाले. अॅड. केदार गांधी, रोहित पारधे, बाबाजी रिकामे, शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या पराक्रमाची व शौर्याची गाथा केंद्रीभूत मानून विद्यार्थ्यांना काढलेल्या रांगोळी व हस्तकला दालनाचे तसेच तयार केलेल्या शिवतेज या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. माता-भगिनींसाठी हळदी कुंकूचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी विविविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम असे पोवाडे, रेकॉर्ड डान्स, समाज प्रबोधनपर नाटीका सादर केल्या. यावेळी मांजरवणे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच बाळाराम कर्जावकर, सदस्य अस्मिता तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे सांस्कृतिक प्रमुख राजन पाटील, विदया शिर्के, सुनिल कालगुडे यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी झाला.
वडघर हायस्कूलचे स्नेहसंमेलन
