| रसायनी | वार्ताहर |
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्हणून वैभव बाळकृष्ण पाटील यांनी शुक्रवारी, (दि.19) जुलैपासून कार्यभार स्वीकारला. वैभव पाटील यांनी याअगोदर 19 वर्षे सेवा बजावली असून, याअगोदर नंदन पाडा ग्रामपंचायतीचे काम पाहिले आहे. त्यांनी त्यांच्या सेवेत घारापुरी, पागोटे, वशेनी व नंदनपाडा या ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळला आहे. त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.