वैभवी इंगळेचे राष्ट्रीय स्तरावर यश

। मुंबई । प्रतिनिधी ।
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सावरकर फेन्सिंग क्लबच्या वैभवी इंगळे हिने महाराष्ट्राचे नेतृत्त्व करीत फेन्सिंगमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. तिचे मार्गदर्शक आनंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत असून राज्यस्तरीय स्पर्धेत वैभवीने यापूर्वी रौप्यपदक जिंकले होते. यातून चार मुलींची राष्ट्रीय फेन्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली. या चार मुलींनी सांघिक कामगिरी करत हरियाणातील सोनीपत येथे 29 व्या कनिष्ठ राष्ट्रीय फेन्सिंग (फॉइल गर्ल्स टीम इव्हेंट) स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. विद्यापीठात झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी फेन्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुद्धा वैभवीची निवड करण्यात आली होती, अशी माहिती तिचे मार्गदर्शक आनंद वाघमारे यांनी दिली आहे. यातही तिने सुवर्ण पदक जिंकलेले आहे.

Exit mobile version