वैजनाथ महादेव भक्तीसागर

| माणगाव । वार्ताहर ।
माणगांवपासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर गांगवली हे ऐतिहासीक गाव असून तेथे प्राचीन वैजनाथ महादेव मंदिर असून या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री उत्सव साजरा होतो. या उत्सवा दिनी भजन, शिवनामाचा गजर दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.महाशिवरात्रीला येथे यात्रेत खाऊची दुकाने, मिठाईची दुकाणे, भाजीपाला. कलिंगड आदी रेलचेल असते मनोरंजनाकरिता चक्र, पाळणे, घोडागाडी यांची पर्वणी असते. शिवमंदिराच्या विस्तीर्ण अशा सुबक गाभार्‍यात उतरण्या करिता दगडी पायर्‍या असून आतमध्ये स्वयंभू अशी मनमोहक शिवलिंग आहे. पूर्वेला तीन फुटावर पार्वती माता विराजमान आहेत. शिवमंदिराचा गाभारा दगडी बांधकामाचा विशेष नमूना असून पुरातन आहे. प्रत्येक दगडावर नक्षी काम केलेले आहे. वैज्ञनाथ महादेव एकाग्रतेने बसल्यास फार मोठे समाधान लाभते.

Exit mobile version