वैजनाथ संघ धाकेश्वर चषकाचा मानकरी

| खांब | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील धाकेश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने यशस्वीरित्या संपन्न करण्यात आलेल्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत वैजनाथ हा संघ चषकाचा मानकरी ठरला आहे.

खांब विभाग क्रिकेट असोसिएशन व धाकेश्वर मित्र मंडळ देवकान्हे यांच्या वतीने देवकान्हे जवळील बाहे येथील प्रशस्त क्रीडा मैदानावर संपन्न करण्यात आलेल्या. या क्रिकेट स्पर्धेत वैजनाथ संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करून अंतिम विजेतेपद पटकावले व गावदेवी बाहे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर धाक्सूद चिल्हे संघाने स्पर्धेतील तृतीय क्रमांक पटकावून सुयश संपादित केले. या सामन्यात उत्कृष्ट फलंदाज पंकज सावरकर वैजनाथ, उत्कृष्ट गोलंदाज रोशन कोंडे चिल्हे, मालिकावीर रोहीत थिटे बाहे संघाने स्पर्धेतील तृतीय क्रमांक पटकावून सुयश संपादित केले. या सामन्यात उत्कृष्ट फलंदाज पंकज सावरकर वैजनाथ, उत्कृष्ट गोलंदाज रोशन कोंडे चिल्हे, मालिकावीर रोहीत थिटे बाहे यांना तसेच विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version