कायद्याच्या कचाट्यात अडकला वैकुंठरथ

परवानगी नसल्याने रथ दस्तुरी नाक्यावर उभा
| कर्जत | प्रतिनिधी |
माथेरान हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे ब्रिटिशकाळापासून असलेल्या कायद्याचे पालन आजही होताना दिसत आहे. याचाच फटका येथे मिशन ग्रुप माथेरान यांनी आणलेल्या वैकुंठरथाला बसला असून, हा रथ कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे.

पूर्वापार येथील सर्व स्मशानभूमी ह्या गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहेत. इथे इतर धर्मीय स्मशानभूमी लांब असल्या तरी त्यांची संख्या लोकसंख्यादेखील बोटावर मोजण्याइतकीच आहे. मुस्लिम धर्मीयांची स्मशानभूमीत ही गावात मध्यवर्ती ठिकाणी आहे, तर हिंदू स्मशानभूमीत ही गावापासून पाच ते सहा किलोमीटर लांब आहे. रूणवाहिका व अग्निशमन दलाची गाडी सोडली तर येथे मोटार वाहनांना बंदी आहे, त्यामुळे एखाद्या माणसाचे निधन झाल्यास त्याला खांद्यावर पाच-सहा किलोमीटर घेऊन जावे लागते. कोरोना काळात ही प्रथा बंद करण्यात आली असून, शववाहिकेचा वापर होत होता. पण, ही बाब खर्चीक असून, ती सामान्य नागरिकांना न पङवणारी आहे, तसेच वेळेतच शववाहिका उपलब्ध होईल हे सांगणे कठीण आहे.

येथे शव खांद्यावर नेण्याची प्रथा आहे पण काळाच्या ओघात खांद्येकरी मिळणे कठीण झाले आहे, त्यामुळे ही समस्या जटिल होत चालली ही गरज ओळखून येथील मिशन माथेरान ग्रुपच्यावतीने पुढाकार घेऊन वैकुंठ रथ उपलब्ध करून देण्यात आला, त्यामुळे मृत्यूनंतरची अवेहलना थांबेल, असे वाटत असताना हा रथ कायद्याचा कचाट्यात सापडला आहे.थोडक्यात संपूर्ण गावाचा पाठिंबा असताना आणि नुकतेच जिल्हाधिकारी हे माथेरानला येऊन माथेरानची संपूर्ण परिस्थिती समजून घेऊनदेखील याला रितसर परवानगी मिळू शकली नाही.

माथेरान आजही ब्रिटिशांचे गुलाम?
आजही माथेरानचे निर्णय सहनियंत्र समिती घेत असल्याने इतर कोणालाही ते अधिकार नाहीत. या समितीच्या सदस्यांना माथेरानच्या भौगोलिक परिस्थितीची जाणीव नाही. हम करोसो कायदा असल्याने माथेरान आजही ब्रिटिश कायद्याचे गुलाम आहेत. सहनियंत्र समितीच्या चुकीच्या निर्णयामुळे आजही माथेरानच्या लोकांची मृत्यनंतरही अवहेलना पहावयास मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे, राज्यकर्ते आणि अधिकारीदेखील सहनियंत्र समितीला एक प्रकारचे समर्थन देतात, असाच काहीचा प्रकार पाहण्यास मिळत आहे.

Exit mobile version