महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकरांना उमेदवारी


| ठाणे | वृत्तसंस्था |

महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते याची उत्कंठा संपली असून वैशाली दरेकर राणे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरेकर यांनी 2009 साली मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी 1 लाखाच्या आसपास त्यांना मते पडून त्या तिसर्‍या क्रमांकावर राहिल्या होत्या. आता त्या शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरत असून खासदार शिंदे यांच्यापुढे कोणते आव्हान उभे करतात हे पाहणे औतुस्न्याचे ठरेल.

ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असून या जिल्ह्यातील ठाणे व कल्याण लोकसभा मतदार संघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी त्यांची लढाई सध्या सुरु आहे. महायुतीमधील मित्रपक्ष भाजपकडून त्यांची कोंडी होत असून सुपुत्र श्रीकांत याचा मतदारसंघ हा भाजपकडे जाऊ नये तसेच आनंद दिघे यांनी खेचून आलेला ठाणे मतदारसंघ देखील आपल्या हातून जाऊ नये यासाठी शिंदे गट प्रयत्नशील आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असे वातावरण असल्याने त्याचा फायदा करुन घेण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ठरविले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे या नेत्यांनी कल्याण पूर्वेत सभा घेत हा मतदारसंघ गाजवला. ठाकरे गट येथे आपली ताकद लावून शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण करणार याची चर्चा आधीपासून येथे सुरु होती. ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर, काँग्रेसचे संतोष केणे, केदार दिघे यांचे नाव आघाडीवर असतानाच ठाकरे यांनी माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करुन सर्वांना अवाक केले आहे.

Exit mobile version