| पाताळगंगा | वार्ताहर |
खालापूर तालुक्यात वालाची शेती बहरली असून वालाच्या शेंगा तुरळक ठिकाणी बाजार पेठेत दाखल झाल्या आहेत. 150 रुपये किलो भाव मिळत आहे. वालाच्या शेंगा बाजार पेठेत मुबलक प्रमाणात येण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागेल असे शेतकर्यांने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. वालाच्या शेंगा सुकून त्याचे वाल तयार होत असते. हेच वाल रोजच्या दैनंदिन जीवनात कडधान्य म्हणून वापरले जाते. शिवाय या वालाची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकर्याला रोजगार मिळत आहे.