। मुंबई । प्रतिनिधी ।
रेल्वेगाड्यांच्या वेळेपत्रकात बदल झाल्यामुळे आठवड्यातून 6 वेळा धावणारी वंदे भारत आता फक्त 3 दिवस धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रकमुळे मुंबई- गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या अप आणि डाऊन फेऱ्या कमी करण्यात येणार आहेत.
पावसाळा सुरु झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वे मार्गावर 15 जुन ते 20 ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येते. त्यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग मंदावतो व याचा मोठा फटका अतिजलद रेल्वेगाड्यांना बसतो. त्यात याचा फटका वंदे भारतला बसला आहे. त्यामुळे सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचा शेकडो फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत व वंदे भारत आता आठवड्यातून फक्त 3 दिवस धावणार आहे.
