वरातीत मल्लखांब-बनाटीचा खेळ

| गोवे-कोलाड । वार्ताहर ।
दिवसेंदिवस सर्व रूढी परंपरा लोप पावत असून सर्व तरुण पिढी मोबाईल व फेसबुक या मध्ये अडकली आहेत. यामुळे वरातीमधील मल्लखांब व बनाटीचा खेळ लोप पावत असतांना दिसत आहेत. परंतु गोवे गावातील तरुणांनी हा खेळ अद्याप ही जोपासला असल्याचा चित्र गोवे येथे वरातीमध्ये दिसून आले.येथे बनाटी व मल्लखांब हा वरातीमधील पारंपारीक खेळ पूर्वीपासून सुरु असून आधुनिक काळातील गोवे येथील तरुण अमित घरट, भीमराज कापसे, विनय दहिंबेकर, प्रल्हाद कापसे, रजत जाधव, सार्थक दहिंबेकर, साहिल पवार, सोहम जवके, हर्षद जाधव, विवेक पवार, प्रणय पवार,तनिष सुर्वे, आयुष जाधव, स्वराज जाधव, मयंग शिर्के, आरती दहिंबेकर,व इतर मुली यांनी हा खेळ जोपासलेला दिसत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील मावळे ही याच लाठीकाठीच्या जोरावर शत्रुला चारिमुंड्या चित करीत असत. या खेळामुळे मन, मस्तक व शरीराला पूरक असणारा शिवकालीन खेळ आहे. आधुनिक काळात एकटी मुलगी दिसली ठिकठिकाणी मुलींवर अत्याचार होतांना दिसत आहे. गोवे गावातील तरुणी याच खेळामुळे आपले संरक्षण करू शकतील यात शंका नाही.

Exit mobile version