। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
सह्याद्री फाउंडेशनतर्फे आयोजित मान्सून महोत्सवानिमित्त वक्तृत्व, सुदृढ बालक, रानभाजी, गायन आदी विविध उपक्रमांद्वारे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध स्तरांवर उपक्रम राबवित आहेत. भविष्यात हे फाउंडेशन आजच्या युवाईला आरोग्य, शिक्षण व सन्मानाच्या दृष्टीने उपक्रम राबविणार आहे, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले आहे.
सह्याद्री फाउंडेशनतर्फे 27 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीत मान्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा प्रारंभ शैक्षणिक उपक्रमांद्वारे कलंबिस्त येथे शनिवारी (दि.27) वक्तृत्व स्पर्धेने करण्यात आला. कलंबिस्त हायस्कूल येथे महोत्सवानिमित्त वक्तृत्व स्पर्धा व शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत मुलांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्राथमिक शाळेतील 30 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, दहावी व बारावीतील खुशी रावळ, मंजुषा राऊळ, विद्या राऊळ, समीक्षा गावडे, दिव्यांक सावंत, श्रद्धा सांगेलकर आदी पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्यप्रमुख अॅड. संतोष सावंत यांनी सूत्रसंचालन केले. माजी सचिव प्रल्हाद तावडे यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील राऊळ, बाबुराव कविटकर, चंद्रकांत शिरसाट, रवींद्र मडगावकर, प्रताप परब, कॅ. दीनानाथ सावंत, कॅ. सुभाष सावंत, कॅ. अरुण सावंत, सपना सावंत, सुरेश पास्ते, बाबा राऊळ, सहदेव राऊत, गुंडू सावंत, भरत गावडे, प्रदीप सावंत, प्रताप परब, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, शशिकांत मोरजकर, गजानन बांदेकर, दीपक राऊळ, विठ्ठल बिडये आदी मान्यवार उपस्थित होते.






