। आगरदांडा । वार्ताहर ।
मुरुड शहरानजीक असणार्या इंग्रजी माध्यम असणार्या डकलीन इंटरनॅशनल स्कूल तर्फे स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने विविध उपक्रम साजरे करण्यात आले. मुरुड तालुका एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलावर महाडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सचिव सुशीलकुमार शिंदे, मुख्याध्यापिका शारदा लाड तर प्रमुख पाहुणे म्हणून समीर दौनाक, हसमुख जैन, माजी नगरसेवक संजय गुंजाळ, मुरुड तालुका सुपारी संघाचे चेअरमन महेश भगत, दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष जाहिद फकजी, साहिल महाडकर, सोहेल महाडकर, तेलवडे सरपंच प्रमोद तांबडकर, माजी सरपंच मनोज कमाने, संतोष पाटील, अजित कारभारी, इस्माईल सिद्दीकी आदी मान्यवर व समस्त विद्यार्थी या ध्वजारोहण कायक्रमासाठी उपस्थित होते.
शालेय परिसरात प्रभात फेरी काढून स्वछतेविषयी जनजागृती सुद्धा करण्यात आली. निबंध व वक्तृत्त्व स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना दिलावर महाडकर सुशीलकुमार शिंदे, शारदा लाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.