बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम

| सुतारवाडी | प्रतिनिधी |

क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदिवासी मोर्चा अध्यक्ष शशिकांत जगताप यांनी आंबिवली, पहूर, पाथर शेत तसेच अन्य आदिवासी वाड्यांमध्ये ज्येष्ठ महिलांना जिवनाश्यक वस्तुंचे वाटप केले. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व पाथरशेत आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करून बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शशिकांत जगताप यांनी विविध आदिवासी वाड्यांमध्ये बिरसा मुंडा यांच्या कार्याची इथंभूत माहिती सांगितली. यावेळी महेश ठाकूर, सुप्रिया वाघमारे, मंजुळा पवार, अलका पवार, विनायक जाधव, संजय वाघमारे, वासंती जगताप, अतुल पवार, गुलाब गोसावी, संतोष कोळी, रूपाली पवार, अनिल खंडागळे, अंगणवाडी सेविका, तसेच अंबिवलीचे मुख्याध्यापक प्रशांत वाघचौरे तसेच असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.

Exit mobile version