मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन

। उरण । वार्ताहर ।

गुरु पौर्णिमे निमित्ताने रविवार (दि.21) पनवेल तालुक्यातील मानघर येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

श्री स्वामी समर्थ मठाचे यंदाचे 14वे वर्षे असून यानिमित्ताने सकाळी 7 वाजता डॉ. सागर चौधरी यांच्या हस्ते अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी सकाळ ते सांयकांळपर्यंत भजनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री लक्ष्मी नारायण प्रासादिक भजन मंडळ कोल्ही कोपर यांच्यासह सुमारे 7 ते 8 भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. तसेच, डॉ.सागर चौधरी यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर ठेवण्यात आले होते. आर. झुनझुनवाला यांच्या नवीन पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्र क्रिया करण्यात आली.

Exit mobile version